संयुक्त महाराष्ट्राचा आवाज पुन्हा जिवंत होतोय! ‘महाराष्ट्र शाहीर’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर!

लोककला म्हटलं की शाहीर साबळेंचं नाव डोळ्यासमोर उभं राहतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचं योगदान मोठं आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं.

अशा या बहुआयामी कलावंताची गोष्ट ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे.

सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता प्रवाह पिक्चरवर होणार आहे.

Reliving the Voice of United Maharashtra Premiere of Maharashtra Shahir

‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचे नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे.

निर्मिती सावंत, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे आणि दुष्यंत वाघ यांच्यासह तगडी कलाकारांची फौज या सिनेमात आहे.

मराठी भाषेचा स्वाभिमान जपणारे आणि मराठी लोकसंगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा नक्कीच पहावा.

शाहीर साबळेंबद्दल:

शाहीर साबळे हे गीतकार, लोकनाट्य लेखक, विनोदवीर, नाट्यदिग्दर्शक, गायक, छायाचित्रकार आणि ढोलकी वादक अशा अनेक कलात्मक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान दिले असून, “जय जय महाराष्ट्र माझा” हे राजगीत महाराष्ट्राला दिले.

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाबद्दल (About Maharashtra Shahir Movie):

“महाराष्ट्र शाहीर” चित्रपट शाहीर साबळेंच्या आयुष्याची, त्यांच्या कार्याची आणि त्यांनी महाराष्ट्राला दिलेल्या देणगीची कहाणी सांगतो. त्यांच्या वैयक्तिक संघर्ष आणि यशांवरही प्रकाश टाकतो.

हे पण वाचा: Bold Web Series: या 3 बोल्ड आणि हॉटनेस ने भरलेल्या वेब सीरीज दार बंद करूनच पहा…

Leave a Comment