Web Series: शिवीगाळ आणि ब्लोड़नेस नाही, या वीकेंडला कुटुंबासह ही शुद्ध कॉमेडी वेब सिरीज पहा

OTT वर अनेक प्रकारचे वेब सिरीज पहायला मिळतात जसे क्राइम, एक्शन, ड्रामा, रोमांस, कॉमेडी पर या मधील अनेक वेब सिरीज मध्ये भरपूर प्रमाणात शिवीगाळ आणि १८+ कन्टेन्ट असते, ज्या मुळे तुम्ही या वेब सिरीज आपल्या कुटुंबासह पाहू शकत नाही. म्हणूनच आज या आर्टिकल मध्ये आपल्यासाठी आम्ही अश्या काही वेब सिरीज ची लिस्ट दिली आहे ज्या मध्ये फक्त शुद्ध कॉमेडी आहे. या वेब सिरीज चा आनंद तुम्ही आपल्या कुटुंबासह घेऊ शकता.

गुल्लक

गुल्लक

मिश्रा परिवारच्या संघर्षाच्या कथेवर आधारित “गुल्लक” चे आता पर्यंत तीन सिजन आले आहेत. या वेब सीरिज मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाचा संघर्ष अतिशय काटेकोरपणे दाखवला आहे. पण या मध्ये कॉमेडी अशी आहे कि तुमचं हसून पोट दुखेल. या वेब सिरीज मध्ये गीतांजली कुलकर्णी, जमील खान, वैभव राज गुप्ता, आणि हर्ष मायार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

ये मेरी फैमिली

ये मेरी फैमिली

जर तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा करायला विसरला असाल तर ही वेब सिरीज तुमच्या सर्व आठवणींना उजाळा देईल. तुम्ही ते Netflix, TVF Play आणि YouTube वर पाहू शकता. ही देखील एक चांगली वेब सिरीज आहे कुटुंबासोबत पाहण्यासाठी.

पंचायत

पंचायत

जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेली पंचायत ही वेब सिरीज ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित एक उत्तम वेब सिरीज आहे. त्याचा पहिला सीझन 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान रिलीज झाला होता. पंचायतीचा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. कुटुंबासह पाहण्यासाठी ही एक उत्तम वेब सिरीज आहे.

द आम आदमी फैमिली

द आम आदमी फैमिली

ही वेब सिरीज मध्यमवर्गीय लोकांच्या छोट्या-छोट्या आनंदावर आधारित आहे. सामान्य माणूस कसा एक एक पैसा साठवून आपल्या घरातील वस्तू घेतो आणि कुटुंबातील सदस्यांसाठी ते किती महत्त्वाचे ठरते हे दाखवण्यात आले आहे. या मालिकेत घरातील सर्व सदस्यांचा आदर, आनंद, इच्छा यासारख्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

Leave a Comment