Pushpa 2 The Rule: या तारखेला होणार अल्लू अर्जुन चा पुष्पा 2 रिलीज…

Pushpa 2 The Rule Movie: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.

Pushpa 2 The Rule Movie

पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर मागच्या वर्षी 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला रिलीज करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. ट्रेलरला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले होते.

पुष्पा 2 चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

पुष्पा 1 चित्रपटात, अल्लू अर्जुनने लाल चंदनाच्या तस्करीच्या जगातून वर येणाऱ्या पुष्पा राजाची भूमिका साकारली होती. पुष्पा 2 मध्ये, पुष्पा राज एक मोठा तस्कर बनलेला दिसणार आहे. त्याला अनेक शत्रूंशी लढा द्यावा लागणार आहे.

पुष्पा 1 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट भारताच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा तेलुगू चित्रपट बनला होता. पुष्पा 2 कडूनही अशीच अपेक्षा आहे.

Also Read: Viral Video: बंद कमरे में लड़कियों ने की ऐसी हरकत वीडियो वायरल, भड़के यूजर…

Leave a Comment