सलमान खान, पूजा हेगड़े, भूमिका चावला, भाग्यश्री, पलक तिवारी, शहनाज गिल, जस्सी गिल, वेंकटेश, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम मल्टीस्टारर सिनेमा “किसी का भाई किसी की जान” रविवार आणि सोमवारी कमाई मध्ये गती पकडल्या नंतर मंगळवारी सुस्त पडला आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Day 5: “किसी का भाई किसी की जान” चित्रपटाचा 5 व्या दिवशीचा बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चित्रपटाने 5 दिवसा मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर 78 करोड रुपयांची कमाई केली आहे. सोमवारी चित्रपटाने 9.50 करोड रुपयांची कमाई केली होती तर मंगळवारी चित्रपटाच्या कमाई 30% घट झाली आणि चित्रपटाने मंगळवारी 6.25 करोड ची कमाई करत एकूण 78 करोड रपयांची कमाई केली आहे. यापुढील चित्रपटासाठी चांगली गोष्ट म्हणजे शनिवार आणि रविवार नंतर सोमवार १ मे रोजी कामगार दिनाच्या सुट्टीचा लाभ मिळू शकतो.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Budget: ‘किसी का भाई किसी की जान’चे बजेट 150 कोटी रुपये आहे. हा चित्रपट देशभरात 4500 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ज्या वेगाने चित्रपटाने पाच दिवसांत 78 कोटींची कमाई केली आहे. गुरुवारपर्यंत पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडू शकणार नाही असे दिसते. पहिल्या आठवड्यात, फरहाद सामजीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर फक्त 87-88 कोटींचा गल्ला गाठू शकेल.
Join our Telegram, Facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा: Bold Actress: या अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून फुटला घाम, दार बंद करूनच पहा ही वेबसिरीज !