'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेतील बालकलाकार त्यांच्या अभिनय शैलीमुळं शॉल्लिड चर्चेत असतात. तारक मेहता का उल्टा चश्मामधील जुनी सोनू अभिनेत्री निधी भानुशाली नेहमीच चर्चेत असते.

नुकताच तिने तिच्या नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. निधीच्या नव्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तुम्ही तिचा नवीन लूक पाहिलाय का?

जर तुम्ही तिचा (Nidhi Bhanushali New Look) नवीन फोटो पाहिला तर, कदाचित तुम्ही तिला ओळखूही शकणार नाहीत. निधीने नवी हेअरस्टाइल केली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

निधीने तिच्या मेकओव्हरचा फोटो इन्स्ट्राग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोंमध्ये निधी काळ्या क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट पँटमध्ये दिसते आहे.

तर दुसऱ्या फोटोमध्ये निधीने समुद्रकिनारी जबराट पोझ दिली आहे. निधीने हटके हेअरस्टाइल केली आहे. निधीची गोड स्माइल बघून चाहतेही हरखून गेले आहेत.

सध्या निधी बालीमध्ये सुट्टी एन्जॅाय करत आहे. निधीने तिथल्या लोकप्रिय ठिकाणाहून तिचे स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. निधीची हेअरस्टाइल बघून तुम्हीही थक्क होऊन जाल.

निधीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत. फोटोवर चाहत्यांनी 'फेव्हरेट, क्यूट, प्रिटी' अशा कमेंट केल्या आहेत.

तर जुना टप्पू म्हणजेच भव्य गांधी यालाही निधीचा नवा लूक आवडला आहे. त्याने निधीच्या फोटोवर 'नाईस' कमेंट केली आहे. निधीच्या नवीन लूकचे चाहते कौतुक करत आहेत.

निधीला 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. मालिकेत निधीने सोनूची व्यक्तिरेखा साकारली होती. निधीने २०१९ मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली.

सध्या निधी ट्रॅव्हल ब्लॅागमध्ये व्यग्र आहे. निधी वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असते. ती तिच्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. निधीचे व्लॉग्स चाहत्यांना खूप आवडतात.