मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट (movie) प्रदर्शित होत आहेत. डोंबिवली फास्ट, सैराट,बालकपालक, फँड्री असे अनेक चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते.  त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'टकाटक'.

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'टकाटक'ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'टकाटक'ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एक महाविद्यालय दिसून येत आहे. म्हणजेच महाविद्यालयातील तरुण मुला-मुलींची दोस्ती, धम्माल, पार्टी, प्रेम, पिकनिक,राडा आणि एंटरटेनमेंट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १८ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे

शिवाय ‘टकाटक २’मध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

चित्रपटाच्या या मोशन पोस्टरमध्ये ‘टकाटक २’मधील कलाकार मंडळीही पाहायला मिळत आहेत. अभिनेता प्रथमेश परब व्यतिरिक्त नव्या कलाकारांची चित्रपटामध्ये एण्ट्री झाली आहे.

अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर आदी कलाकार या चित्रपटात काम करताना दिसतील. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे.

या चित्रपटामध्ये तरुणाईला व सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एक संदेश देण्यात आला आहे. याच तरुणाईच्या प्रश्नांवर आधारित आता 'टकाटक २' हा विनोदी चित्रपट १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.